छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुरोगामी विचारांना अनुसरून सर्वसमावेशक विचारसरणीशी बांधिलकी ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार (NCP-SP) १० जून १९९९ रोजी या पक्षाची स्थापना करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाची मूलभूत मूल्ये ही सामाजिक न्याय, लोकशाही, महिला सबलीकरण, बालकल्याण आणि उपेक्षित समुदायांचा विकास या तत्त्वांवर आधारित आहेत, ज्यात प्रगतीशील आणि लोककेंद्रित धोरणांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
१९९९ मध्ये दिल्लीतील आव्हानात्मक राजकीय वातावरणात NCP-SP पक्षाची स्थापना झाली. प्रतिकूल परिस्थिती असतानाही, आ. खा. शरद पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची प्रेरणा घेऊन पक्षाचे नेतृत्व केलं आणि लोककल्याणावर लक्ष केंद्रित केलं.
वेबसाईटवरील ‘देणगी’ या पेजवर जाऊन देणगी देऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिशनला पाठिंबा दर्शवू शकता. तुमचे योगदान हे पक्षाचे उपक्रम पुढे नेण्यास आणि समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने कार्य करण्यास महत्त्वपूर्ण ठरते..
प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख प्रस्थापित करण्यात NCP-SP ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, मुख्य क्षेत्रांमध्ये विकास आणि कल्याणाला चालना देणाऱ्या अजेंड्यावर काम करत आहे.
The National Spokespersons of NCP-SP are the voices representing the party’s values and policies. They communicate our mission and shape public discourse with clarity and conviction.
राष्ट्रीय सचिव राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण कार्ये व्यवस्थापित करतात, पक्षाच्या कार्यासाठी प्रभावी समन्वय आणि समर्थन सुनिश्चित करतात आणि पक्षाची भूमिका पुढे नेण्यात मदत करतात.
महाराष्ट्र राज्य कार्यसमिती समर्पित नेतृत्वाखाली प्रगतीशील आणि सर्वसमावेशक महाराष्ट्राच्या दिशेने काम करत संपूर्ण राज्यात ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाची रणनीती तयार करते आणि त्याची अंमलबजावणी करते.
जिल्हाध्यक्ष हे जिल्हा स्तरावर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ उपक्रमांना मार्गदर्शन करतात आणि पाठिंबा देतात, पक्षाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची भूमिका बजावून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाचे कार्य पोहोचवण्याचं कार्य प्रदेश जिल्हाध्यक्ष करत आहेत.
NCP-SP पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते हे पक्षाच्या मूल्यांचे आणि धोरणांचे प्रतिनिधित्व करणारे पदाधिकारी आहेत. ते पक्षाचे ध्येय धोरणांचा प्रचार व प्रसार करतात. पक्ष आणि समाज यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आहेत.
'सहभागी व्हा' या पेजवर तुमचा तपशील भरून तुम्ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून सामील होऊ शकता. कार्यकर्ता हा पक्षाचा महत्त्वपूर्ण घटक आहे, जनसेवेस तत्पर राहण्यासोबतच संघटनात्मक कौशल्यांना चालना देण्याचं काम कार्यकर्ता करत असतो.
You can support NCP-SP’s mission by making a donation through our Donation page. Your contributions help advance our initiatives and work towards a prosperous Maharashtra.
वेबसाईटवरील भाषणे या पर्यायावर आ. खा. शरद पवार साहेब आणि पक्षाच्या इतर नेत्यांची महत्त्वाची विधाने, भाषणे आणि प्रेरणादायी संदेश हे पाहायला मिळतील.
आमच्या फोटो गॅलरीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार’ पक्षाशी संबंधीत महत्त्वाच्या घटना, मोहिमा आणि टप्पे व अन्य इतर महत्त्वाची बाबींचे छायाचित्र पाहायला मिळतील.
तुमची गोपनीयता जपण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार’ पक्ष कटिबद्ध आहे. संपूर्णपणे गोपनीयता पाळण्यास आम्ही बांधील आहोत. आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कशी संकलित करतो किंवा वापरतो हे सर्व काही संरक्षित आहे. तुमचा डेटा अत्यंत सावधगिरीने हाताळला जाईल याची आम्ही खात्री देतो.